स्थानिक

बारामती बिल्डर असोसिएशनचे एक दिवस काम बंद आंदोलन

दरवाढ रोखण्यासाठी नियामक नेमण्याची मागणी

बारामती बिल्डर असोसिएशनचे एक दिवस काम बंद आंदोलन

दरवाढ रोखण्यासाठी नियामक नेमण्याची मागणी

बारामती वार्तापत्र
बांधकाम व्यवसायामधे काम करण्यासाठी लागणारे बांधकामसाहित्य हा मुख्य घटक
असतो तो साधारणपणे बांधकाम खर्चाच्या 70% पर्यंत असतो हे दर स्थिर असतील तर केलेल्या
व्यवसायामध्ये काही नफा होत असतो.बांधकाम साहित्या मध्ये मुख्य भाग हा सिमेंट व स्टील चा असतो. या उत्पादन करणाऱ्या
कंपन्या वेळोवेळी साखळी पद्धतीने अनैसर्गिक दरवाढ करतात यामुळे शासकीय कंत्राटदार यांचे निविदा पद्धतीने घेतलेल्या कामामध्ये तसेच इमारत बांधकाम व्यवसाईक यांचे
उदयोगामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या सतत च्या दर वाढीमुळे सरकारला अपेक्षित
परवडणारी घर योजना सुद्धा अडचणीत आल्या आहेत.

सरकार ने बांधकाम व्यवसायाला
शिस्त निर्माण होणे करिता जसे रेरा सारखा कायदा लागू केला तसेच सर्व बांधकाम साहित्य उत्पादक यांचे दर स्थिर रहाणे करिता केंद्रीय पातळीवर नियामक (Regulator) नेमावा अशी
मागणी बिल्डर्स असो ऑफ इंडिया च्या वतीने करण्यात आली होती. परंतु या मध्ये निर्णय होत
नसल्याने शुक्रवार दि. 12 फेब्रु. 2021 रोजी राष्ट्रीय व सर्व राज्य पातळीवर एक दिवस काम बंद
आंदोलन करण्याचे आयोजन बिल्डर्स असो ऑफ इंडिया तर्फे करण्यात आले आहे.

यामध्ये बिल्डर्स
असो.बारामती सहभागी होणार असून या काम बंद आंदोलनास अध्यक्ष, क्रेडाई, बारामती
यांनी त्यांचे संस्थेचे व इतर ही बांधकाम व्यवसाईक या आंदोलनास समर्थन देऊन सहभागी होणार आहेत.
असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आज बांधकाम उदयोग हा सर्वात मोठा उदयोग असून सर्वात जास्त रोजगार निर्मिती
करणारा, सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठा हातभार लावणारा असून उदयोग दर्जा प्राप्त नसताना
मोठ्या व्याजाची कर्जे घेऊन चालू असतो. अशा व्यवसाया मध्ये काम करणाऱ्या उद्योजकास
स्थिरता निर्माण होनेकारिता सरकार ने मागणी मान्य करावी असे निवेदन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram