इंदापूर

बारामती-भिगवण रस्त्यावर ट्रॅक्टर-ट्रकची जोरदार धडक, अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट; ट्रॅक्टरसह चालकाचा दुर्दैवी मृत्यू!

अपघातानंतर दोन तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प…

बारामती-भिगवण रस्त्यावर ट्रॅक्टर-ट्रकची जोरदार धडक, अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट; ट्रॅक्टरसह चालकाचा दुर्दैवी मृत्यू!

अपघातानंतर दोन तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प…

इंदापूर; प्रतिनिधि

इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदापूरच्या पिंपळे येथे भिगवण–बारामती राज्य मार्गावर रात्री साडे-दहाच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला.

भिगवणकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचा आणि बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा जोरदार धडक झाल्याने ट्रॅक्टर थेट ट्रकच्या खाली शिरला आणि ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. यात ट्रॅक्टर चालक केबिनमध्ये अडकून पडला. धडकेनंतर ट्रकचाही दाबा सुटून तो रस्त्यावर उलटला.

दरम्यान, अपघात इतका भयानक होता की दोन्ही वाहनांनी काही क्षणांतच पेट घेतला. ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मात्र ट्रक चालक घटनास्थळी आढळला नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ट्रक चालक बचावासाठी अपघातानंतर पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

या भीषण घटनेत ट्रक आणि ट्रॅक्टर दोन्हीही पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. ट्रकच्या दोन्ही बाजूंनी पेट घेतल्याने ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर भिगवण–बारामती रोडवर तब्बल दोन तासांपेक्षा जास्त काळ वाहतुकीच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

भिगवण पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल असून, भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.

Back to top button