बारामती भिगवनरोडवर मोरयानगर रहिवाशांनी केला रास्ता रोको, ओढ्याच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत कारवाई करण्याची मागणी
परिसरात रोगराई वाढली

बारामती भिगवनरोडवर मोरयानगर रहिवाशांनी केला रास्ता रोको, ओढ्याच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत कारवाई करण्याची मागणी
परिसरात रोगराई वाढली
बारामती वार्तापत्र
बारामती भिगवनरोडवर मोरयानगर येथील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्वीपासून असलेल्या ओढ्यामध्ये उतरून अर्ध नग्न आंदोलन करून ओढ्यावर असलेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यावेळी सर्वसामान्य व्यक्तींच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली. व बड्या व्यक्तींच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली नाही.
त्यावेळी बड्या व्यक्तींना या कारवाइतून अभय का देण्यात आले हा प्रश्न नागरिकांना पडला आहे?त्यानंतर आजही बारामती भिगवनरोडवर नागरिकांनी रास्ता रोको करून आंदोलन केले. ओड्यांवर केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे पाणी साठून रोगराई पसरत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
आज पुन्हा येथील नागरिकांनी रास्ता रोको करून ओड्यावर झालेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत व रोगराईबाबत आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.ऐन दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे.
प्रशासन बेकायदेशीर बांधकामाबाबत कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे यापुढेही असेच आंदोलन केले जाणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.आता प्रशासन या ओढ्याच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत काय कारवाई करणार?याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.