बारामती मतदारसंघात २०४ ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क्
२०४ इतक्या मतदारांनी घरातूनच मतदान केले.
बारामती मतदारसंघात २०४ ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क्
२०४ इतक्या मतदारांनी घरातूनच मतदान केले.
बारामती वार्तापत्र
भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बारामती विधानसभा मतदारसंघात ९ नोव्हेंबर आणि १० नोव्हेंबर या कालावधीत ८५ पेक्षा अधिक वय असलेल्या १५७ तर ४७ दिव्यांग असे एकूण २०४ मतदारांनी घरूनच मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदारसंघात ८५ पेक्षा जास्त वय असलेले १७० इतके मतदार आणि ४० टक्के पेक्षा जास्त शारीरिक विकलांग असलेले ४९ इतके मतदार आहेत. या मतदारांना घरातून मतदानाची सोय उपलब्ध् करुन देण्यात आली असून त्याकरीता त्यांच्याकडून घरातूनच मतदान करण्याबाबत 12 डी अर्ज भरुन घेण्यात आले त्यानुसार ९ आणि १० नोव्हेंबर रोजी २०४ इतक्या मतदारांनी घरातूनच मतदान केले.
या मतदान प्रक्रियेकरीता एकूण ११ पथके तयार करण्यात आले होते. घरातूनच करण्यात येणाऱ्या मतदानाबाबतचे वेळापत्रक तयार केले, मतदारांच्या घरी भेटी देवून आयोगाच्या सर्व मार्गदर्शकांचे पालन करुन मतदान केंद्र स्थापन करुन गोपनीयरित्या मतदान करुन घेण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.