बारामती मधील मुस्लिम समाजाची मीटिंग पोलीस स्टेशन ला आयोजित केली होती.
पार्श्वभूमिवर बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. औदुंबर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती मधील मुस्लिम समाजाची मीटिंग संपन्न.
बारामती मधील विविध मस्जिदिंचे ट्रस्टी/ईमाम(धर्मगुरु)/प्रतिनिधी यांची मीटिंग बारामती शहर पोलीस स्टेशन ला आयोजित केली होती.यावेळेस श्री.औदुंबर पाटील साहेब यांनी – सद्धयाच्या लाॅक डाऊन च्या पीरियडमधे सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांवरील बंदी/निर्बंध कायम असल्यामुळे ईदगाह, मस्जिद, दर्गाह बंदच राहणार आहेत तेंव्हा सर्व मुस्लिम बाँधवांनी ईद ची नमाज लाॅक डाऊन चे पालन करत आप-आपल्या घरीच अदा करावी असे निर्देश दिले आहेत.
त्याचबरोबर यंदाची ईद कोरोनाच्या सावटाखाली असल्यामुळे कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठीची खबरदारी तथा दक्षता म्हनून मुस्लिम बाँधवांनी त्यांच्या धार्मिक रिती-रिवाजानुसार परस्परांना ईदच्या शुभेच्छा गळाभेट करुन न देता सुरक्षित अंतर (सेफ़ डिस्टंसींग) ठेऊन तोंडी शुभेच्छा देन्याचा अंमल करावा व यंदाची रमजान ईद “सुरक्षित ईद – आरोग्यदायी ईद” या संकल्पनेतुन साजरी करावी असे आवाहन केले.
यावेळी श्री.औदुंबर पाटील साहेब यांनी सर्व मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईद च्या अग्रिम शुभेच्छा दील्या.