बारामती मधील 59 जणांचा अहवाल निगेटिव्ह.
तर 10 जणांचे अहवाल प्रतीक्षेत
बारामती ;वार्तापत्र
बारामतीत कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या ६९ पैकी ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत १० जणांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती शहरात मागील आठवड्यात तीसहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींसह संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढवण्यात आल्या आहेत. काल शहर आणि परिसरातील ६९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरीत १० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
अचानकपणे शहरात वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता निगेटिव्ह अहवालांची संख्या वाढू लागल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे.