कोरोंना विशेष

बारामती मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर सहाजण संशयीत.

सीसीसी पाठोपाठ खासगी रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार.

बारामती मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर सहाजण संशयीत.

सीसीसी पाठोपाठ खासगी रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार.

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांवर बारामती कोविड केअर सेंटर ( CCC ) रुई येथे उपचार सुरू असून आज दि.21 जुलै रोजी बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून यांच्यावर खाजगी रुग्णालयातच कोविड 19 विभागात उपचार सुरू असलेची माहीती बारामती वार्तापत्र ला नाव न सांगण्याच्या अटी वर मिळाली असून अजून सहा संशयीत रुग्णही येथे उपचार घेत असल्याचे समजले आहे,त्यामुळे मुंबई-पुण्या पाठोपाठ बारामती येथे खासगी रुग्णालयात ही कोविड 19 च्या रुग्णांवर उपचार सुरू केल्याचे दिसून येत आहे.

बारामती तालुक्यातील रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेता स्थानिक वैद्यकीय तज्ञ पुढे येऊन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी तत्पर असल्याचे यातून दिसून येत आहे.

तसेच बारामतीकरांनी सुद्धा दिवसागणिक वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता ही परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज असून खबरदारी चे उपाय म्हणून केंद्र शासन तसेच राज्य शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे योग्य असे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. विनाकारण घराबाहेर न पडता घरीच राहून स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षितता बाळगण्याची गरज असून सद्यपरिस्थिती पाहता हे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button