कोरोंना विशेष

बारामती मध्ये चौदावा करून रुग्ण.

बारामती तांदूळवाडीतील कल्याणीनगर भागात आढळला.

बारामती मध्ये चौदावा करून रुग्ण आज तांदूळवाडीतील कल्याणीनगर भागात आढळला. पुण्याहून आलेल्या तीस वर्ष युवकास कोरोनाची लागण झाल्याचे आज निदान झाले. त्यामुळे तांदळवाडी चा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. बारामतीमध्य कोरोना रूग्णांची संख्या शून्यावर आणली होती. त्यानंतर तालुक्याच्या
ग्रामीण भागात माळेगाव, वडगाव निंबाळकर व मूर्टी येथे रुग्ण आढळले,परंतु बारामती शहरात आता रुग्ण नव्हता. आज तांदुळवाडी मधील कल्याणी नगर भागात राहणाऱ्या एका युवकास कोरोनाची लागण झाल्याने कोरोनामुक्त बारामतीचे स्वप्न तूर्तास
भंगले आहे. दरम्यान या रुग्णावर बारामतीतच उपचार सुरू आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली.

Related Articles

Back to top button