बारामती मध्ये प्रेम प्रकरण संशयावरून अल्पवयीन मुलावर हल्ला
तिघांच्या विरुद्ध कलम 326 34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे
बारामती मध्ये प्रेम प्रकरण संशयावरून अल्पवयीन मुलावर हल्ला
तिघांच्या विरुद्ध कलम 326 34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे
क्राईम;बारामती वार्तापत्र
आज दुपारी4.00 वां महानगर बँकेजवळ भिगवण रोड नाना काशीद यांच्या सलून च्या दुकानासमोर शेखर शशिकांत कारंडे वय 17 वर्षे राहणार त्रिमूर्ती नगर धंदा शिक्षण याच्यावर त्याचेच मित्र असणारे गणेश वाघमोडे व त्याचा साथीदार यश पवार यांनी आणखी एका अज्ञात मित्रासोबत आरोपी गणेश वाघमोडे याच्या प्रेम प्रकरणामध्ये शेखर कारंडे हा येत असल्याबाबतचा संशय घेऊन तो त्याच्या मित्रासोबत केस कापण्यासाठी आलेला असताना त्याच्यावर कोयत्याने वार केला त्याच्या डोक्याला व पाठीला जबर जखम झालेली आहे.
सदर जखमी इसमाचा जबाब नोंदवून वरील तिघांच्या विरुद्ध कलम 326 34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे अधिक तपास पोलीस हवालदार जगताप हे करत आहेत सदरचा प्रकार भररस्त्यात झाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दवाखान्यात जाऊन जखमींची चौकशी केली व घटनास्थळावर भेट दिली. प्रथमदर्शनी आरोपी सुद्धा अल्पवयीन असावेत आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.