बारामती मध्ये फिट इंडिया अंतर्गत – सायक्लोथॉन
साधारण ३०० सायकल स्वरांनी या दहा किलोमीटर सायकलोथॉन मध्ये भाग घेतला होता

बारामती मध्ये फिट इंडिया अंतर्गत – सायक्लोथॉन
साधारण ३०० सायकल स्वरांनी या दहा किलोमीटर सायकलोथॉन मध्ये भाग घेतला होता.
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यातील उच्च पदस्थ पोलीस अधिकारी यांच्यासमवेत बारामतीकरांनी सायकल राईडचा अनुभव घेतला बारामती कर सायकल पट्टू नी घेतला
रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ फिट इंडिया मिशन अंतर्गत संडे सायकल on आणि फिट इंडिया अंतर्गत पुणे ग्रामीण पोलीस , बारामती नगरपरिषद बारामती आणि बारामती सायकल क्लब यांच्या समवेत पहाटे ६ वाजता..शारदा प्रांगण, भिगवण चौक, बारामती येथून या कार्यक्रमाला सुरुवात झाली, सर्वप्रथम पुण्यातून आलेल्या प्रेरणा जैन यांनी मेडिटेशन, हिलिंग आणि योगा याद्वारे सर्व उपस्थित त्यांना मार्गदवर्शन केले तर नंतर पुणे जिल्ह्याचे ग्रामीण विभागाचे एसपी संदीपसिंग गिल यांच्यासमवेत, गणेश बिडकर अतिरिक्त जिल्हा अधीक्षक बारामती विभाग, आणि सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग, तसेच विलास नाळे, पोलीस निरीक्षक बारामती शहर आणि श्रीमती वैशाली पाटील पोलीस निरीक्षक बारामती तालुका यांच्या समवेत बारामती सायकल क्लबचे असंख्य सदस्य आणि पोलीस कर्मचारी अशा साधारण ३०० सायकल स्वरांनी या दहा किलोमीटर सायकलोथॉन मध्ये भाग घेतला होता.
सदरच्या सायकल राईड करिता सुरुवात शारदा प्रांगण- भिगवण चौक – इंदापूर चौक – गुणवडी चौक – गांधी चौक- पुन्हा भिगवण चौक – भिगवण रोड मार्गे – एमआयडीसी – पेन्सिल चौक – विद्या प्रतिष्ठान – रुईपाटी जवळून पुन्हा भिगवण रोड मार्गे- शारदा प्रांगण ,भिगवण चौक , बारामती येथे समाप्ती.. असा १० किलोमीटर चा मार्ग होता
रॅली समाप्तीनंतर शारदा प्रांगण येथे सायकल रॅली मध्ये भाग घेणाऱ्या सर्वासाठी आकर्षक सर्टिफिकेट पोलीस अधिकारी यांचे हस्ते वाटप झाले.