स्थानिक

भारतीय जैन संघटना बारामती शाखा तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त महिलांकरिता विशेष परिसंवादाचे संपन्न

महिलांनीही मनमोकळेप्रमाणे विविध शंकांचे समाधान

भारतीय जैन संघटना बारामती शाखा तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त महिलांकरिता विशेष परिसंवादाचे संपन्न

महिलांनीही मनमोकळेप्रमाणे विविध शंकांचे समाधान

बारामती वार्तापत्र 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बदलत्या राहणीमानामुळे, बदलत्या खाद्य संस्कृतीमुळे, दूषित वातावरणामुळे दिवसेंदिवस कॅन्सरच्या पेशंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. हा एक मोठा सामाजिक प्रश्न उपस्थित झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळते.

याचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय जैन संघटनेतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगासंबंधी समाजात, महिलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी याकरिता पुणे येथील प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉक्टर अश्विन राजभोज यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते.

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या महिला सबलीकरण विभाग च्या सहकार्याने सदर व्याख्यान यशस्वीपणे पार पडणेस सहकार्य केले. यामध्ये महिलांना खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आणि महिलांनीही मनमोकळेप्रमाणे विविध शंकांचे समाधान करून घेतले.

याप्रसंगी कॅन्सर आजारावर यशस्वीपणे मात करणाऱ्या कॅन्सर योद्धांचे अनुभव, मार्गदर्शन ही झाले. त्यांचा सत्कार संघटनेच्या वतीने अध्यक्ष सम्यक छाजेड आणि महिला विभागाचे अध्यक्ष गीतांजली शहा यांनी केला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारतीय जैन संघटनेचे बारामती शाखेचे सर्वच पदाधिकारी आणि प्रोजेक्ट हेड विपुल शहा. (वडूजकर), सौ नंदिता शहा, सौ संगीता मेहता, प्रा राहुल शहा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button