स्थानिक

बारामती मध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफास, एका मुलीची केली सुटका गुन्हे शोध पथकाचे कामगिरी

एका 27 वर्षीय मुलीची सुटका केली आहे

बारामती मध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफास, एका मुलीची केली सुटका गुन्हे शोध पथकाचे कामगिरी.

एका 27 वर्षीय मुलीची सुटका केली आहे

बारामती वार्तापत्र

बारामती एमआयडीसीमधील एशियन पेंट्स या बंद पडलेल्या कंपनीच्या इमारतीमध्ये एक इसम महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाला मिळाली होती, त्याप्रमाणे बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून वेश्या व्यवसायास मुली पुरवणारा. दीपक अर्जुन नाळे, वय 45 वर्षे,डोरलेवाडी, तालुका बारामती, यास अटक केली असून एका 27 वर्षीय मुलीची सुटका केली आहे
सदरची कारवाई मा. मा.पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामिण श्री.अभिनव देषमुख साो,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण षिरगावकर यांच्या मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक महेष ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, महिला पोलीस नाईक आशा शिरतोडे,पोलीस काॅस्टेबल नंदु जाधव,राहुल पांढरे,विजय वाघमोडे,मंगेष कांबळे,विनोद लोंखंडे,दत्तात्रय मदने, यांनी केलेली आहे.

Related Articles

Back to top button