
बारामती मध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची जयंती
९२ व्या जयंती
बारामती वार्तापत्र
अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती यांच्यावतीने स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंती साजरी करण्यात आली .
या प्रसंगी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा समन्वयक प्राजक्ता येरुळकर, अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तालुकाध्यक्ष संभाजी माने,शहराध्यक्ष हेमंत नवसारे शहराध्यक्षl अर्चनाताई सातव व ऍड वीनाताई फरतडे, प्रियंका जराड, शितल यादव , बाळासाहेब पिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून नवीन उद्योजक तयार व्हावेत व त्या उद्योजकांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जिल्हा समन्वयक प्राजक्ता येरूळकर यांनी सांगितले.
महामंडळाच्या कर्ज प्रकरणाशी संबंधित व अनेक लाभार्थी व ज्यांच्या अडचणी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले व सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे कार्य स्मरणीय व प्रेरणादायी असल्याचे संभाजी माने यांनी सांगितले.आभार अर्चना सातव यांनी मानले.