बारामती मेडिकल कॉलेजमध्ये उपचाराऐवजी पोलिसांची धमकी; इंदापूरच्या रुग्णाचा धक्कादायक आरोप
इंदापूर तालुक्यातील रुग्णाने सांगितला अनुभव

बारामती मेडिकल कॉलेजमध्ये उपचाराऐवजी पोलिसांची धमकी; इंदापूरच्या रुग्णाचा धक्कादायक आरोप
इंदापूर तालुक्यातील रुग्णाने सांगितला अनुभव
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील वैद्यकीय महाविद्यालयसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून आकर्षक अशी इमारत उभी केली आहे.परंतु त्या ठिकाणी असलेले कर्मचारी रुग्णांची हेळसांड करताना दिसत आहेत.
इंदापूर तालुक्यातील उद्धट तावशी येथील रुग्णाच्या नातेवाईकाने स्वतःच्या वडीलांना त्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन गेल्यानंतर आलेला अनुभव सांगितला आहे.
मी आणि माझे वडील ज्या वेळेस त्या ठिकाणी गेलो त्यावेळी तेथील काही कर्मचार तर हाताखालचे लोक आहेत.त्यांनी दीड आम्हाला तास उभे केलं.दुसर कोणताही पेशंट त्या ठिकाणी नसताना सुद्धा तरी आम्हाला एक तास उभ केलं.
येथील कर्मचारी कामचुकार आहेत.
माझे वडील ऍडमिट होते.त्या ठिकाणी माझे वडील छातीचे स्कॅन करण्यासाठी ऍडमिट होते.तिथे त्यांनी काय केलं.नर्स लोकांचा संप होता आणि शिकाऊ लोकांना सुई काढायला लावली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्त वाया गेल.
मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं.त्यांनी व्हिडिओ काढण्यास विरोध केला.त्यांच्या कामचुकारपणामुळे परंतु त्यांनी आम्हाला बाहेर काढण्याची धमकी दिली.
येथील कर्मचारी पोलिसांना बोलावतो ह्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढा अशी धमकी देतात.असा थरारक अनुभव त्या रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितला.
बारामतीचे आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या वैद्यकीय महाविद्यालयाच्या होत असलेल्या रुग्णांच्या हेळसांड बाबत लक्ष घालणार का? व नागरिकांची होणारी हेळसांड थांबवणार का हे पाहणे महत्वाच ठरेल.