बारामती मोरगाव रस्त्यावर नेपतवळण जवळ अपघात; सात मजूर सह नऊ जण गंभीर जखमी..
तालुका पोलीस घटनास्थळी दाखल
बारामती मोरगाव रस्त्यावर नेपतवळण जवळ अपघात; सात मजूर सह नऊ जण गंभीर जखमी..
तालुका पोलीस घटनास्थळी दाखल
बारामती वार्तापत्र
बारामती मोरगाव रस्त्यावर नेपतवळण जवळ पावणेपाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी मजूर आपल्या ट्रॅक्टरट्रॉलीतून ऊस तोडणीसाठी जात होते. पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास बारामती मोरगाव रस्त्यावरील नेपतवळण येथे पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली.
या अपघातात एकनाथ गर्दाळ चव्हाण, हिराबाई एकनाथ चव्हाण, भाऊसाहेब एकनाथ चव्हाण, बाजीराव तुकाराम जाधव, मंजुळा बाजीराव जाधव, अशोक एकनाथ चव्हाण, अंजू अशोक चव्हाण, रवींद्र बाजीराव जाधव (४ वर्ष) राधा बाजीराव जाधव (दिड वर्षे) इम्तियाज मलिक (चालक), साहिल मलिक हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन सातव, गटप्रमुख जगन्नाथ खोमणे, दिपक वाघ, शक्तिसिंह देवकाते, अनिल धुमाळ त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान बारामती तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास बारामती पोलीस करीत आहेत.