बारामती युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
तरुणांचा मोठा सहभाग, 114 बॅग रक्त संकलन
बारामती युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
तरुणांचा मोठा सहभाग, 114 बॅग रक्त संकलन
बारामती वार्तापत्र
राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व पुरंदर हवेली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
बारामती युवक काँग्रेस व बारामती विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास युवकांनी मोठा प्रतिसाद देत 114 बॅग रक्तसंकलन झाले.
प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव दादासाहेब काळे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ दादा दौंडकर, बारामती काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र राजे निंबाळकर ,महाराष्ट्र प्रदेश सदस्य आकाश दादा मोरे ,बारामती शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भाऊ इंगुले, ज्येष्ठ नेते ॲड इन्कलाब शेख, बारामती काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब देवकाते या कार्यक्रमास उपस्थित होते.
पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस वीरधवल गाडे ,बारामती युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव रघुनाथ बुरुंगले, उपाध्यक्ष सुशांत सोनवणे, बारामती विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आकाश पांडे ,पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष विपुल भिलारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.