स्थानिक

बारामती युवक काँग्रेस तर्फे उत्तर प्रदेश सरकारचा व या हल्ल्यात सामील असलेले मंत्री अजय मिश्रा निषेध 

उत्तर प्रदेश सरकार उठले शेतकऱ्यांच्या जिवावर..!!.

बारामती युवक काँग्रेस तर्फे उत्तर प्रदेश सरकारचा व या हल्ल्यात सामील असलेले मंत्री अजय मिश्रा निषेध

उत्तर प्रदेश सरकार उठले शेतकऱ्यांच्या जिवावर..!!.

बारामती वार्तापत्र

आज उत्तर प्रदेश मधील लखिमपुरा जिल्ह्यात झालेल्या अमानुष हल्ल्यात भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा समोर आला आहे.. उत्तर प्रदेश चे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या समोर अहिंसक पद्धतीने चालू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांना, उत्तर प्रदेश चे गृह राज्यमंत्री अमित मिश्रा यांचा मुलगा मोनु मिश्रा याने गाडीने चिरडले, प्रसंगी दोन शेतकऱ्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

निर्दयी पणाचा कळस आज उत्तर प्रदेश सरकारने गाठला आहे..

कोरोना,नोटबंदी, महागाई , नैसर्गिक आपत्ती या सगळ्या गोष्टीने शेतकरी मेटाकुटीला आलाय, त्यात हे असंवेदनशील सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे.जनरल डायर ला देखील लाजवेल असा किळसवाणा, प्रसंगी चीड आणणारा प्रकार उत्तर प्रदेश मध्ये घडला.

गेली १० महिने ऊन,वारा,पाऊस कशाची तमा न बाळगता जाचक कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करतोय त्याला दिलासा देण्या ऐवजी त्यांना गाडीने चिरडले जाते ही लाज आणण्यासारखी गोष्ट आहे.

मंत्रीच असे वागु लागले तर सामान्य जनतेने कोणाला जाब विचारावा..?

या घटने विरोधात आज बारामती युवक काँग्रेस तर्फे उत्तर प्रदेश सरकारचा व या हल्ल्यात सामील असलेले मंत्री अजय मिश्रा यांचा जाहिर निषेध केला गेला , या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी ॲड. आकाश मोरे, बारामती काँग्रेस शहराध्यक्ष अशोक भाऊ इंगूले, युवक जिल्हा सरचिटणीस वीरधवल गाडे, बारामती युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव बुरुंगले आकाश पांडे, सौरभ रुपनवर, ॲड.शंतनु माळशिकारे,सुरज खोमणे, तुषार देवकाते,अमोल देवकाते,भारत रामचंद्रे आदि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button