स्थानिक

बारामती येथील ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद

दैनंदिन गरजांसाठी किराणा साहित्य व आवश्यक वस्तू स्वरूपात मदत

बारामती येथील ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद

दैनंदिन गरजांसाठी किराणा साहित्य व आवश्यक वस्तू स्वरूपात मदत

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशन ही नोंदणीकृत सामाजिक संस्था असून ती दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे.

समाजातील वंचित, गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याच्या उद्देशाने संस्थेने यावर्षीही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

वर्षअखेरीस संस्थेच्या वतीने सुपे येथील प्राजक्ता मतिमंद मुलांची निवासी शाळा तसेच गोजुबावी येथील निवासी शाळा यांना भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच संस्थेच्या दैनंदिन गरजांसाठी किराणा साहित्य व आवश्यक वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
या सामाजिक उपक्रमात ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशनच्या सर्व सभासदांनी खारीचा वाटा उचलत स्वेच्छेने सहभाग घेतला. संस्थेच्या या कार्याबद्दल अध्यक्ष सौ. गीता पोटे यांनी सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले.

ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशन ही संस्था बारामती परिसरात महिलांना विविध व्यासपीठांवर संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ओळखली जाते. त्याच अनुषंगाने येत्या ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान बारामती येथील जिजाऊ मंगल कार्यालय येथे संक्रांतीनिमित्त महिलांसाठी तीन दिवसीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सामाजिक उपक्रमात संस्थेच्या अध्यक्ष सौ. गीता पोटे, सचिव सौ. दर्शना जैन व त्यांचे परिवार, खजिनदार कु. संस्कृती पोटे तसेच संस्थेचे सल्लागार श्री. पतकी अश्विनी कुमार यांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी सचिव सौ. दर्शना जैन यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती निवासी शाळांच्या संस्थापकांना दिली.

दोन्ही निवासी शाळांच्या वतीने ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशन, बारामती यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.

सध्या सुमारे दोनशे सभासद असलेल्या या संस्थेमार्फत येत्या वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सामाजिक उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

Back to top button