शैक्षणिक

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये यावर्षीपासून बी.एस्सी (ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी) या अभिनव पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग अनुभव मिळणार आहे.

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये यावर्षीपासून बी.एस्सी (ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी) या अभिनव पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग अनुभव मिळणार आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये यावर्षीपासून बी.एस्सी (ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी) या अभिनव पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेणारे तुळजाराम चतुरचंद कॉलेज हे महाराष्ट्रातील पहिले स्वायत्त महाविद्यालय ठरले आहे.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय हे मागील 63 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील एक नामांकित महाविद्यालय असून नुकतेच या महाविद्यालयाला नॅक समितीकडून सर्वोच्च श्रेणी प्राप्त झाली आहे.

आयटी क्षेत्रात झपाट्याने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाच्या संधी आणि रोजगाराच्या वाढत्या मागणी तसेच जगभरात डेटा सिक्युरिटीसाठी वाढत असलेली ब्लॅाकचेन तंत्रज्ञानाची मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या २०२५ या शैक्षणिक वर्षामध्ये हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

सध्या उद्योग क्षेत्रात असलेल्या गरजा आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

ब्लॅाकचेन तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांची टीम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमात सर्व विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिसशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग अनुभव मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.

या अभ्यासक्रमासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थी तसेच डिप्लोमा धारक विद्यार्थी पात्र असणार आहेत.
अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी
+91 99751 75415 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

Back to top button