बारामती येथील भाजी विक्रेते फारूक तांबोळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू
अनेक मनोरुग्णांचा वावर असून त्याचा त्रास नेहमीच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे

बारामती येथील भाजी विक्रेते फारूक तांबोळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू
अनेक मनोरुग्णांचा वावर असून त्याचा त्रास नेहमीच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे
बारामती वार्तापत्र
बारामतील वयोवृद्ध गरीब प्रामाणिक कष्टाळू भाजी विक्रेते फारूक इसाकभाई तांबाळी हे नेहमी प्रमाणे आपली हातगाडी घेऊन लक्ष्मी नगर कसबा येथे भाजी विकत असताना एक विकृत गुंडांने फारुखभाई यांना दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने डोक्यात जोरदार प्रहार करून जखमी केले होते त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते.
अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या उपचाराच्या मदतीसाठी बारामतीकरां पुढे आव्हान केले होते घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचारासाठी होणारा खर्च त्यांचे कुटुंबीय पेलू शकणार नव्हते त्यामुळे बारामतीतील अनेक दानशूर लोकांनी तांबोळी यांच्या उपचारासाठी मदत केली होती डोक्याला झालेल्या अघाता मधून सावरू होऊ न शकल्याने त्यांचा अखेर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला .
बारामती परिसरात मंडई एसटी स्टँड डॉ.आंबेडकर स्टेडियम या भागात अनेक मनोरुग्णांचा वावर असून त्याचा त्रास नेहमीच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे परंतु या मनोरुग्णांच्या बंदोबस्त करण्यासाठी बारामती पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका अपयशी ठरताना दिसत आहेत. तांबोळी यांच्या मृत्यूनंतर तरी ह्या मनोरुग्ण वर कारवाई होईल का याकडे समस्त बारामतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.