बारामती येथील हॉटेल व्यवसायिक व व्यापारी वर्गाला दिलासा.
बाजारपेठ सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी.
बारामती येथील हॉटेल व्यवसायिक व व्यापारी वर्गाला दिलासा.
बाजारपेठ सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी.
बारामती:-प्रतिनिधी
बारामती येथे शनिवारी सापडलेल्या पाच कोरोना रुग्णांच्या मुळे व सतत वाढत असलेल्या संख्येमुळे खबरदारी म्हणून रात्री ७ वाजेपर्यंत चालू असणारी बाजारपेठ सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली होती परंतु गर्दी टाळण्याकरिता ही वेळ पुन्हा ७ वाजेपर्यंत करण्यात आली असून हॉटेल ची पार्सल सुविधा रात्री १० वाजेपर्यंत सुरु असणार आहे.
नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने उशिरापर्यंत कामावर असलेल्यांची पाच वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहत असल्याने मोठी गैरसोय होत होती. या निर्णयाने अशा लोकांना दिलासा मिळणार आहे.
लोकांनाही दोन तास अतिरिक्त मिळाल्याने त्यांचीही सोय होणार आहे. दरम्यान, सर्वच दुकानांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनेटायझरचा वापर, येणा-या ग्राहकांची नोंद ठेवणे, अशा बाबी अनिवार्य असून, सर्व व्यावसायिकांनी या बाबींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन दादासाहेब कांबळे यांनी केले.
यावेळी उपस्थिती बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष शैलेश साळुंके, प्रवीण आहुजा आणि स्वप्नील मुथा उपस्थित होते.