कृषी

बारामती येथे कीड रोग नियंत्रण प्रशिक्षण संपन्न

कीड रोग नियंत्रण प्रकल्पाविषयी माहिती

बारामती येथे कीड रोग नियंत्रण प्रशिक्षण संपन्न

कीड रोग नियंत्रण प्रकल्पाविषयी माहिती

बारामती वार्तापत्र 

उपविभागीय कृषी विभागामार्फत फळपिकावरील पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प-क्रॉपसॅप व हॉर्टसॅपअंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा तालुका फळ रोपवाटिका कन्हेरी येथे आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेमध्ये सोयाबीन, मका, ऊस, तूर, भात, डाळिंब केळी, टोमॅटो व भेंडी या पिकावर आकस्मिक उद्भवणाऱ्या कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान व उत्पादनात होणारे घट लक्षात घेता प्रभावी कीड-रोग व्यवस्थापन, राष्ट्रीय कृषी विकास योजनाअंतर्गत पिकावरील कीड रोग नियंत्रण प्रकल्पाविषयी माहिती दिली.

शारदानगर कृषी विज्ञान केंद्राचे विशेषतज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी सोयाबीन, भात, तुर, मका, ऊस डाळिंब, केळी, टोमॅटो व भेंडी या फळपिकावरील प्रमुख कीड-रोगांची ओळख व त्यावरील करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांचा जन्मदिन “शेतकरी दिन”म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, दौंडचे तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाने, इंदापूरचे तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, पुरंदर तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, उपकृषी अधिकारी प्रताप शिंदे, सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे तर आभार प्रदर्शन तंत्र अधिकारी रश्मी जोशी, यांनी केले.

Related Articles

Back to top button