राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट
इम्पिरिकल डाटा देण्याची मंत्री छगन भुजबळ यांनी केली मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट
इम्पिरिकल डाटा देण्याची मंत्री छगन भुजबळ यांनी केली मागणी
इंदापूर : प्रतिनिधी
ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून गुरुवारी (दि.५) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली.यामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने आग्रही असून केंद्र सरकारने शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा द्यावा याविषयी राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित होते. याशिवाय समर्पित ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, आयोगाचे सदस्य एच.बी.पटेल, पंकज कुमार, महेश झगडे, नरेश गीते, शैलेशकुमार दरोकर आदी उपस्थित होते.