शैक्षणिक
बारामती येथे हिवाळी क्रीडा शिबीर उत्साहात संपन्न…
एकूण १९० क्रीडा प्रेमींनी या शिबिरात सहभाग
बारामती येथे हिवाळी क्रीडा शिबीर उत्साहात संपन्न…
एकूण १९० क्रीडा प्रेमींनी या शिबिरात सहभाग
बारामती वार्तापत्र
बारामती-पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा क्रीडाकुल विभाग निगडी आणि जनहित प्रतिष्ठान बारामती केंद्र यांच्यासोबत टाटा ट्रस्टसच्या विशेष योगदानाने ग्रासरूट क्रीडाकुल प्रकल्पांतर्गत बारामती,फलटण, दौंड व इंदापूर या चार तालुक्यात ग्रामीण भागातील खेळाडू गेले वर्षभर खेळाडू विकसन प्रकल्पाचे काम सातत्याने चालू आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बारामती उपकेंद्रातील मुलांचे एकत्रित हिवाळी क्रीडा शिबीर दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत जनहित प्रतिष्ठान विद्यालय बारामती येथे संपन्न झाले.
दौंड तालुक्यातील वरवंड, फलटण तालुक्यातील मुळीकवाडी, इंदापूर तालुक्यातील पळसदेव, तसेच बारामती तालुक्यातील जनहित प्रतिष्ठान व डोर्लेवाडी या सर्व स्पोक मधील बारामती केंद्र म्हणून १२५ खेळाडू व निगडीतून ४० खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक, शिबिर स्वयंसेवक, विद्यालयातील सहकारी शिक्षक, ट्रेनर,मान्यवर अशा एकूण १९० क्रीडा प्रेमींनी या शिबिरात सहभाग घेतला.
या शिबिरामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी, जीवन कौशल्य प्रशिक्षण ,कबड्डी,मल्लखांब ॲथलेटिक्स, आर्चरी, योगासन, संचलन अशा विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विकासासाठी महत्त्वपूर्ण कौशल्य शिकण्याची संधी मिळाली.या तीन दिवसीय शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष पारितोषिके देण्यात आली.
या शिबिराच्या समारोपप्रसंगी खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळांची प्रात्यक्षिके करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
सदर शिबिराचे नियोजन केंद्रप्रमुख श्री. धनंजय क्षीरसागर व केंद्र समन्वयक श्री. सचिन नाळे यांनी केले. यासाठी लाइफ स्किल ट्रेनर श्री निलेश भोंडवे, स्पोक ट्रेनर श्री.अजिंक्य साळी, श्री. महादेव टकले, श्री.करण बळीप,श्री. सागर बनसोडे, श्री. सुजित कालगावकर श्री.प्रणव बनसोडे या सर्वांनी सहकार्य केले.
शिबिराच्या उद्घाटन व समारोप प्रसंगी टाटा ट्रस्टस स्पोर्ट हेड सौ निलम बाबर देसाई मॅडम, केंद्रप्रमुख निगडी श्री.मनोज देवळेकर, तालुका क्रीडा अधिकारी श्री.महेश चावले, बारामती जिल्हा संघचालक श्री.दीपकजी पेशवे,प्रोजेक्ट मॅनेजर श्री.संकल्प थोरात, क्रीडा मार्गदर्शक श्री.भगवान सोनवणे, डॉक्टर मेधा देवळेकर, अस्मिता बारसवडे, विद्यालयाचे अध्यक्ष श्री किशोर कानिटकर, समन्वयक कार्याध्यक्ष श्री.किशोर शिवरकर, सचिव श्री सतीश गायकवाड, जनहित प्रतिष्ठान उपाध्यक्ष श्री अविनाश बिराजदार, आचार्य श्री हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री अतुल कुटे,बालभवन प्रमुख श्री निलेश भोंडवे,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , खेळाडू व क्रीडा प्रेमी पालक उपस्थित होते.