
बारामती येथे १६ जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
सोमवार, १६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता
बारामती वार्तापत्र
नागरिकांच्या शासनाच्या विविध विभागाकडील अडचणी दूर करण्यासोबतच त्यांच्या प्रलंबित असणाऱ्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवार, १६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बारामती तहसील कार्यालय येथे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.
नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनात सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हरकती, दावे या लोकशाही दिनात मांडाव्यात, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.