स्थानिक

बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्योग व व्यापारी सेलच्या कार्यकारणी जाहीर

अजित पवार गटाला उद्योग व व्यापारी क्षेत्रात अधिक बळ मिळेल

बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्योग व व्यापारी सेलच्या कार्यकारणी जाहीर

अजित पवार गटाला उद्योग व व्यापारी क्षेत्रात अधिक बळ मिळेल

बारामती वार्तापत्र

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून उद्योग व व्यापारी क्षेत्रात संघटनात्मक बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत उद्योग व व्यापारी सेलच्या अध्यक्षपदी प्रवीण आहूजा यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे स्थानिक व्यापारी व उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

या बैठकीदरम्यान केवळ अध्यक्षपदाचीच नव्हे, तर संपूर्ण कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली. शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. पक्षातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत विविध पदांवर पुढीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

🔹 अध्यक्ष – प्रवीण आहूजा
🔹 कार्याध्यक्ष – निखिल रविंद्र मुथा, रमेश बाबासो साळुंखे
🔹 उपाध्यक्ष – राहुल भिमराव एकाड, पंकज पोपटलाल गादिया
🔹 सरचिटणीस – योगेश नवनाथ सस्ते
🔹 चिटणीस – लक्ष्मीकांत आसुदामल रोहाणी
🔹 खजिनदार – अमोल अशोक पालकर
🔹 कार्यकारिणी सदस्य

अमित दीपक शाह, संतोष सोमतीलाल मेहता, रविंद्र संपतराव लगड, युसुफ इनुस बारामतीवाला, प्रफुल्ल एकनाथ शिळवणे, चेतन प्रमोद व्होरा, धीरज करमशील पटेल, संजय धर्मचंद रायसोनी, अलीअजगर युसुफभाई शापुरवाला, निलेश उत्तमराव महाडिक, प्रकाश गणपत मत्रे आदींचा समावेश आहे.

नवनियुक्त अध्यक्ष प्रवीण आहूजा यांनी यावेळी बोलताना, बारामती शहरातील व्यापारी व उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल, असे सांगितले. तसेच, पक्षाच्या धोरणांना व्यापारी वर्गापर्यंत पोहोचवून संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या नव्या कार्यकारिणीमुळे बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला उद्योग व व्यापारी क्षेत्रात अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Back to top button