स्थानिक

संकल्प ग्राम विकास फाउंडेशन प्रस्तुत ‘ॲनिमिया : मुक्त माझं गाव’ लघुपटाचे चित्रीकरण पूर्ण

मुक्त माझं गाव’ हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

संकल्प ग्राम विकास फाउंडेशन प्रस्तुत ‘ॲनिमिया : मुक्त माझं गाव’ लघुपटाचे चित्रीकरण पूर्ण

मुक्त माझं गाव’ हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

बारामती वार्तापत्र 

संकल्प ग्राम विकास फाउंडेशन निर्मित आणि सागर अशोक भोसले लिखित-दिग्दर्शित ‘ॲनिमिया: मुक्त माझं गाव’ या सामाजिक लघुपटाचे चित्रीकरण नुकतेच शिर्सुफळ (ता. बारामती) येथे यशस्वीपणे पार पडले. रक्तक्षय (ॲनिमिया) ही एक गंभीर शारीरिक समस्या आहे.

ग्रामीण भागातील गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुले-मुली आणि लहान बालकांमध्ये वाढती रक्तक्षयाची (ॲनिमिया) समस्या या लघुपटाचा केंद्रबिंदू आहे.

सागर भोसले हे गेली दहा वर्षे समाजकार्य क्षेत्रात कार्यरत असून, ॲनिमिया विषयक जनजागृती करण्यासाठी त्यांनी हा लघुपट तयार केला आहे.

योग्य आहार, उपचार व जनजागृतीच्या माध्यमातून ही समस्या दूर होऊ शकते, हा सकारात्मक संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.

या लघुपटात गजानन कुंभार(तात्या), गोरक्ष मोहिते पाटील, रेणुका साळुंके ,मयुरी गायकवाड यांनी अभिनय केला आहे.

‘ॲनिमिया : मुक्त माझं गाव’ हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ग्रामीण जनतेमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सागर भोसले यांच्या मार्फत एक स्तुत्य उपक्रम करण्यात आला आहे असे प्रतिपादन शिर्सुफळच्या सरपंच जुई हिवरकर यांनी केले.

Back to top button