स्थानिक
बारामती वकील संघटनेची निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी होणार
कोरोनामुळे दोन वर्ष पुढे ढकलण्यात आली होती.
बारामती वकील संघटनेची निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी होणार
कोरोनामुळे दोन वर्ष पुढे ढकलण्यात आली होती.
बारामती वार्तापत्र
बारामती वकील संघटनेच्या २०२२-२०२३ च्या होणाऱ्या निवडणूकीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वकील संघटनेच्या या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पदाकरिता ४ तर व उपाध्यक्षपदासाठी ९ जणांनी उमेदवारी फॉर्म भरला आहे.
येत्या ५ फेब्रुवारीला मतदान असणार आहे….यामध्ये बारामती वकील संघटनेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. यंदाची निवडणूक ही खरी चुरशीची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. दर वर्षी वकील संघटनेची होणारी निवडणूक ही कोरोनामुळे दोन वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. ती आता पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण ६७० च मतदान असणार आहे.