बारामती वार्तापत्र चा इफेक्ट्स;नविन अत्याधुनिक शववाहिनी उपलब्ध-मुख्याधिकारी पंकज भुसे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक शववाहिनी उपलब्ध-

बारामती वार्तापत्र चा इफेक्ट्स;नविन अत्याधुनिक शववाहिनी उपलब्ध-मुख्याधिकारी पंकज भुसे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक शववाहिनी उपलब्ध-मुख्याधिकारी पंकज भुसे
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून नगरपरिषदेला अत्याधुनिक नविन शववाहिनी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली आहे.
यापूर्वी शहरात वापरात असलेली शववाहिका जुनी व मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे अंत्यविधीच्या वेळी शववहन करताना अडचणी निर्माण होत होत्या. या नवीन शववाहिनीच्या माध्यमातून शहरातील मृत व्यक्तींच्या शव वहनाचे काम नगरपरिषद व राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार असून सन्मानपूर्वक शववहन होण्यास मदत होणार आहे.
नगरपरिषदेच्या हद्दीत ही सेवा मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याकरिता संजय प्रभुणे-९७६४४४१४०९ आणि चालक राजेश लोहाट- ९७६४४४१४४५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. भुसे यांनी केले आहे.
चौकट
बारामती वार्तापत्र यांनी शववाहिनी उपलब्ध व्याहवी म्हणून वारंवार पाठपुरावा केला होता त्यांचा परिणाम म्हणून सदर शववाहिनी उपलब्ध झाल्याचे नागरिकांनी सांगून समाधान व्यक्त केले.
बारामती नगर परिषद श्रीमंत परंतु अंत्यविधीसाठी वाहन व्यवस्था गरीब
बारामती नगर परिषद श्रीमंत परंतु अंत्यविधीसाठी वाहन व्यवस्था गरीब श्रीमंत असणारी नगरपरिषद मृतदेह वाहण्यासाठी वाहन गरिबासारखे असल्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बारामती वार्तापत्र प्रत्येकाचा शेवट झाल्यानंतर त्याला एक ना एक दिवस स्मशानभूमीमध्ये जावे लागते. संपूर्ण देशामध्ये बारामती नगरपरिषद ही विकास कामाबाबत अग्रेसर आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा विकास होत असताना…
बारामती नगर परिषद श्रीमंत परंतु अंत्यविधीसाठी वाहन व्यवस्था गरीब