बारामती विधानसभा मतदारसंघातून मंगलदास निकाळजे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल
बारामती विधानसभा मतदारसंघातून मंगलदास निकाळजे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल
बारामती वार्तापत्र
काही दिवसापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून श्री मंगलदास निकाळजे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी जाहीर झाल्याबरोबरच श्री मंगलदास निकाळजे यांनी बारामती विधानसभा लढवण्यासाठी सज्ज होत नामांकन अर्ज भरण्यासाठी तयारी केली.
निकाळजे यांची नामांकन रॅली आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी बारामती विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथून सुरू करण्यात आले.
निकाळजे यांनी सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करण्याकरता तसेच सर्व धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याकरता प्रथम चांद शाहवली दर्गा येथे दर्शन घेतले तसेच पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत पुढे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच राष्ट्रमाता जिजाऊ व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले पुढे निकाळजे यांनी बारामती मधील स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच सिद्धेश्वर गल्ली येथे सिद्धेश्वर मंदिर येथे सिद्धेश्वराचे दर्शन घेतले.
त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे अभिवादन केले व पायी नामांकन रॅली सुरू करण्यात आली.
या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनतेचा व महिलांचा खुप मोठ्या प्रमाणात सहभाग होता या नामांकन रॅलीमध्ये सतीश भाई साळवे, प्रतीक चव्हाण, गणेश थोरात, कृष्णा साळुंके, सुरज कोरडे, पुण्यशील लोंढे, रामदास जगताप, अनुप मोरे, डॉ सुधीर साळवे, रोहित भोसले, विनय दामोदरे, तसेच किशोर मोरे जेष्ठ सल्लागार कृष्णा सोनवणे, अमोल धेंडे, जितेंद्र जगताप, अमोल दनाने, सागर गवळी, जितेंद्र कवडे, अशोक कुचेकर, कीर्ती कुमार वाघमारे, प्रितम कांबळे, उमेश मोरे, धिरज कांबळे, संतोष चव्हाण, मुकुंद शेख, मंगेश मिसाळ, भारत मिसाळ, मोहन तात्या शिंदे, सुलतान आताळ, दत्ता भोसले, सचिन जगताप, सिद्धांत सावंत, भारती सोनवणे, सारिका कांबळे, अनिता निकाळजे, पूजा निकाळजे आदी जनसमुदाय उपस्थित होता.