बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या विजयासाठी मुलगा जय पवार गाव भेट दौरा म्हणाले, ‘लोकसभेला ताई अन् विधानसभेला अजितदादा…’
शरद पवार आमचे दैवत मी त्यांच्यावरती काही बोलणार नाही असे जय पवार म्हणाले
बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादांच्या विजयासाठी मुलगा जय पवार गाव भेट दौरा म्हणाले, ‘लोकसभेला ताई अन् विधानसभेला अजितदादा…’
शरद पवार आमचे दैवत मी त्यांच्यावरती काही बोलणार नाही असे जय पवार म्हणाले
बारामती वार्तापत्र
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. सर्वत्र प्रचार सुरू आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचं कुटूंब प्रचारात उतरल्याचं दिसून येत आहे.
आज बारामतीमध्ये अजित पवारांचा प्रचार करण्यासाठी जय पवार गाव भेट दौरा करत आहे. यावेळी त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात लोकांनी ठरवलं होतं, लोकसभेला सुप्रिया ताई आणि आता विधानसभेला अजितदादा त्याच्यामुळे लोक भरघोस मताने दादांना निवडून देतील असा विश्वास जय पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात जय पवार गाव भेट दौरा करत आहेत. नव्या पिढीला संधी द्या, असे शरद पवार म्हणाले होते त्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावरती काही बोलणार नाही असे जय पवार म्हणाले. तसेच छगन भुजबळ यांच्या संदर्भात मला काही माहिती नाही मी ते वाचले नाही असं जय पवार म्हणाले आहेत.
आम्ही वाड्या वस्त्यांवरती जात आहोत. गाव भेट दौरे करत आहोत, प्रचार करत आहोत. महिला, युवा आणि सर्वांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहेत. आत्तापर्यंत अजित पवारांनी केलेलं काम, योजना, पाणी, रोजगार आणि बाकी योजना या मुद्द्यांना घेऊन आम्ही अजित पवारांचा प्रचार करत आहोत. लोकसभेच्या वेळी जे लोक शरद पवारांच्या बरोबर होते ते लोक आता अजित दादांसोबत असल्याचं दिसून येत आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, असंही यावेळी जय पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीकरांनी आधीही ठरवलं होतं, लोकसभेला ताई आणि विधानसभेला अजित दादा, एकदा बारामतीकरांनी ठरवलं तर ते पार पाडतात. सगळी मते दादांच्या बाजुने आहेत.
छगन भुजबळांच्या सदर्भात जय पवारांची प्रतिक्रिया
छगन भुजबळ यांच्याबाबतीत आलेली बातमी मी पाहिली नाही. वाचली नाही, त्यामुळे मी त्यावर काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असं जय पवार यांनी म्हटलं आहे.