बारामती विधानसभा मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न
एकूण २३ उमेदवार रिंगणात
बारामती विधानसभा मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न
एकूण २३ उमेदवार रिंगणात
बारामती वार्तापत्र
निवडणूक निरीक्षक नझीम खान यांच्या उपस्थितीत बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असलेल्या मतदान यंत्राची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) नवीन प्रशासकीय भवनातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात संगणकीय पद्धतीने पार पडली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे, नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार पुनम दंडिले उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३८६ मतदान केंद्रांसाठी ९२६ बॅलेट युनिट्स, ४६३ कंट्रोल युनिट्स आणि ५०१ व्हीव्हीपॅट्सची सरमिसळ संगणकीय पद्धतीने करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान नावडकर यांनी उमेदवार आणि प्रतिनिधींना सादरीकरणाच्या माध्यमातून या सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.
नावडकर म्हणाले, बारामती मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात असून नोटाचा पर्यायही उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट्सची आवश्यकता भासणार आहे. मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये कोणताही बिघाड झाल्यास तात्काळ नवीन मतदान यंत्र बदल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.