इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा यांचा पदाचा राजीनामा, अचानक राजीनाम्याने ; हर्षवर्धन पाटील समर्थकांना धक्का..
सन 2006 पासून सलग पंधरा वर्षे ते इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा यांचा पदाचा राजीनामा, अचानक राजीनाम्याने ; हर्षवर्धन पाटील समर्थकांना धक्का..
सन 2006 पासून सलग पंधरा वर्षे ते इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
इंदापूर : बारामती वार्तापत्र
इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी गुरुवार दिनांक 29 एप्रिल रोजी आपल्या सर्व पदांचा अचानक राजीनामा दिला आहे. यामुळे इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून खळबळ उडाली आहे.
मी पक्ष कधीच सोडणार नाही ; आजही मी पक्षासोबत…
मी माझ्या घरगुती अडचणीमुळे थांबण्याचा निर्णय घेतला आहे.मी सर्व पदाचा राजीनामा दिला असला तरी मी पक्षापासून दूर गेलो नाही. मी आजही माझ्या नेत्यासोबत आहे. आणि कायम असेल.समाजकार्य करायला पदांची गरज नसते त्यामुळे यापुढे ही कायम समाजकार्यात असेल. राजकारणात प्रत्येकालाचं कुठेतरी थांबावे लागते म्हणून मी थांबण्याचा स्वतःहून निर्णय घेतला आहे.मात्र नेत्याच्या खांद्याला खांदा लावून सोबत असेल – श्री.भरत शहा
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कडून कोणतीही प्रतिक्रिया नाही…
भरत शहा यांच्या राजीनाम्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का बसलेला आहे.एक विश्वासू निकटवर्ती राजीनामा का देतात याच्यावर सर्व स्तरात चर्चा रंगली आहे.मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या कडून भरत शहा यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
भरत शहा यांनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहणार असून इंदापुरातील जनतेसाठी काम करत राहणार असा मनसुबा व्यक्त केला.
सन 2006 पासून सलग पंधरा वर्षे ते इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. गेल्या दहा वर्षापासून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते कार्यरत होते. भरत शहा यांनी पाच वर्षे इंदापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद भूषवले आहे. सन 2017 पासून आजतागायत ते नगरसेवक म्हणून काम पाहत होते. इंदापूर नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा अंकिता शहा या त्यांच्या वहिनी आहेत.