बारामती व इंदापूर तालुक्यातील २४ गुंड तड़ीपार… कोण आहेत हे नेमके गुन्हेगार? यांची नावे क़ाय? वाचा….
बारामती पोलिसाची मोठी कारवाई.
बारामती तालुका व इंदापूर तालुका येथील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी कड़क उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे,
बारामती व इंदापूर तालुक्यातील तब्बल २४ जणांना तड़ीपार केले आहे.
अनेक सराईत गुन्हेगार हे आपापल्या परिसरात आपले बस्तान बसवित असतात, अटक झाल्यानंतर पुन्हा जामिनावर ते बाहेर निघतात आणि परिसरात दहशत पसरवत असतात, त्यांच्या अशा दहशतीला घाबरून अनेक नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत याचाच गैरफायदा घेत ते आणखी गुन्हे करीत असतात त्यांची अशी ही वाढत चाललेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अशा सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करीत असतात अशीच कारवाई बारामती विभागाच्या पोलिसांनी केली आहे,
बारामती तालुक्यात व इंदापूर तालुक्यात ज्यांच्यावर ती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, अशांचे तडीपाराचे प्रस्ताव वरिष्ठ विभागाला पाठविले होते, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप तसेच इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना अशा गंभीर स्वरूपातील गुन्हेगारांचा प्रस्ताव पाठविला होता सदर चे प्रस्ताव यांची सखोल चौकशी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केली सदरच्या प्रस्तावांबाबत शिरागावकर यानी शहानिशा व चौकशी करून आरोपींना तडीपार करण्याबाबतचा अहवाल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सादर केला होता, सदर अहवालावर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी एकूण चोवीस आरोपींना तडीपार करण्याचे आदेश दिलेले आहेत.
बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अक्षय उर्फ आकाश बापू जाधव, रविंद्र उर्फ पप्पू तुकाराम मदने, दोन्ही रा. मळद यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौड तसेच अहमदनगर जिल्हयातील कर्जत व सोलापुर जिल्हातील माढा,करमाळा व अकलुज या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दिपक तानाजी चव्हाण, रा.माळेगाव बु., तुषार उर्फ जंब्या अंबाजी खोमणे, रा माळेगांव, किरण शंकर खोमणे, रा. माळेगांव,राजन बाळासाहेब पैठणकर, रा. माळेगांव, सचिन विलास खरात, रा. माळेगांव ,अमोल भारत जगताप, रा. माळेगांव,ऋषीकेश हनुमंत चव्हाण, रा माळेगाव, संग्राम राजेंद्र चव्हाण, रा माळेगांव ,राहूल बाळासाहेब जाधव, रा. माळेगांव, मनोज बाळासाहेब पाटोळे, रा शिरवली, ता. बारामती यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड, पुरंदर तसेच सातारा जिल्हयातील फलटण व सोलापुर जिल्हातील माळशिरस या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे.
तर इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बबलू उर्फ सौरभ मनोहर पवार, रा. रणगाव, ता. इंदापुर ,प्रितम सुरेश जाधव, सचिन अर्जुन गोसावी,अनिकेत उर्फ बापू शिवाजी रणमोडे , इन्नू सरहिम नशिद पठाण रा रणगाव, संदिप रामभाऊ गोसावी रा रणगाव,महेश महादेव अर्जुन रा चिखली, ता. इंदापुर, कुपदिप पोपट रक्टे, रा रणगाव , पिंटू उर्फ दिपक औदुंबर
उबाळे रा वालचंदनगर , जेतस शिवाजी जाधव रा कळंब,नितीन हरिभाऊ भोसले रा लासुर्णे, सचिन शिवाजी अर्जुन यांना पुणे जिल्हयातील इंदापुर, बारामती, दौंड तसेच सोलापुर जिल्हातील माढा व माळशिरस या तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले आहे.अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत..