बारामती शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी व शुक्रवारी बंद राहणार,कोणत्या भागात पाणी येणार नाही?
नागरिकांना सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन - मुख्याधिकारी

बारामती शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी व शुक्रवारी बंद राहणार,कोणत्या भागात पाणी येणार नाही?
नागरिकांना सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन – मुख्याधिकारी
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा विभागाअंतर्गत भिगवण रोड तीनहत्ती चौका लगतच्या नीरा डावा कालवा पुलावरील अडथळा ठरणारी पाण्याची लाईन बदलण्याचे काम सुरू आहे. यामुळेच गुरुवारी व शुक्रवारी रोजी बारामती शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद
१) सिध्दार्थनगर, भीमनगर, चंद्रमणीनगर, विठ्ठलनगर, कोअरहाऊस, वडार सोसायट्या, बढकेनगर, सटवाजीनगर इत्यादी संपूर्ण आमराई विभागात गुरुवार, दिनांक २८/०४/२०२२ रोजी पाणी पुरवठा बंद राहील.
या भागात पाणीपुरवठा बंद
२) विजयनगर, पोस्टरोड, जवाहरनगर, सिनेमारोड, महावीर पथ, बुरुडगल्ली, नेवसे रोड, सिध्देश्वर गल्ली, कसबा गल्ली, सनगर गल्ली, श्रीराम गल्ली या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक २९/०४/२०२२ रोजी बंद राहील.
तरी संबंधित भागातील नागरिकांनी नोंद घेवुन पुरेसा पाणी साठा करून पाणी काटकसरीने वापरुन नगर परिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.