बारामती शहरातल्या श्रीरामनगर परिसरात अचानक भीषण आग
2 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने तब्बल दोन तासांनी ही आग आटोक्यात आणली.

बारामती शहरातल्या श्रीरामनगर परिसरात अचानक भीषण आग
2 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने तब्बल दोन तासांनी ही आग आटोक्यात आणली.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातल्या श्रीरामनगर परिसरात अचानक भीषण आग लागली. आगीचे आगीचे नेमके कारण स्पष्ट नाही. मात्र, या आगीमध्ये परिसरातील वनसंपदा जळून खाक झाली. बारामती शहरातील श्रीरामनगर आणि गालिंदेनगर परिसरात दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.
रिकाम्या जागेत गवत आणि झाडेझुडपे वाढल्याने या भागातील आगीने रौद्र रूप धारण केले. स्थानिक नागरिकांनी काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अागीची तीव्रता जास्त असल्याने त्यात यश आले नाही. अखेर बारामती नगरपालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने तब्बल दोन तासांनी ही आग आटोक्यात आणली. आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. मात्र, शॉर्ट सर्किट मुळे आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान या आगीमुळे अनेक झाडे जळून खाक झाली आहेत.