कोरोंना विशेष

बारामती शहरातील अजून 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे

बारामतीतील रुग्णसंख्या 411 झालेली आहे.

बारामती शहरातील अजून 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

बारामतीतील रुग्णसंख्या 411 झालेली आहे.

बारामती वार्तापत्र

आज बारामतीत सकाळी 21 जण कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर 67 जणांचा अहवाल प्रतीक्षेत होता त्यामुळे आज बारामती कोरोनाचा आकडा अधिक ओलांडणार की काय अशी भीती होती, मात्र कालचा उर्वरित 67 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 62 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

वडगाव निंबाळकर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण तसेच मुढाळे येथील एक रुग्ण व शहरातील गुणवडी चौक येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण.

बारामती शहरातील दोन रुग्ण असे एकूण पाच रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत व आजची दिवसभराची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 26 झाली आहे.

आता बारामतीतील रुग्णसंख्या 411 झालेली आहे.

अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ. मनोज खोमणे यांनी दिली.

Back to top button