बारामती शहरातील शिवाजी चौक ते मळद फाटा या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न सुटला आहे.
अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी : रस्त्यासाठी हॅमचा तोडगा

बारामती शहरातील शिवाजी चौक ते मळद फाटा या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न सुटला आहे.
अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी : रस्त्यासाठी हॅमचा तोडगा.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील शिवाजी चौक ते मळद फाटा या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हॅमअंतर्गत रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्यामुळे शिवाजी चौकातील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून दळणवळणास चालना मिळणार आहे.
बारामती नगरपरिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या तांत्रिक वादात शिवाजी चौक ते मळद फाटा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर मार्ग काढत हॅम अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्याची सूचना केल्या. त्यानुसार या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला. रस्त्याची रुंदी वाढण्यात आली आहे.
बारामती शहराबरोबरच परिसरातील मळद, गुणवडी, डोर्लेवाडी तसेच झारगडवाडी आदी गावातील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे. मोरगाव बारामती ते नीरा नरसिंहपूर या अंतर्गत होत असलेल्या हॅम योजनेतून या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. या रस्त्याबरोबरच बारामती शहरात विविध विकास कामांना वेग आला आहे.
हॅमअंतर्गत मोरगाव ते नीरा नरसिंगपूर रस्त्याचे काम सुरू आहे. बारामती शहरातील शिवाजी चौक ते मळद फाटा रस्त्याचे काम करण्यात येत आहे. दहा मीटर रुंदीचा रस्ता करण्यात आला आहे. भूमिगत गटारे तसेच साइडपट्टी देखील करण्यात येणार आहे.
-विश्वास ओव्हाळ, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
गेली अनेक वर्षापासून शिवाजी चौक ते मळद फाटा या रस्त्याचे काम रखडले होते. रस्त्याचा काही भाग नगरपरिषद हद्दीत तर काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्यामुळे रस्त्याच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना सूचना दिल्या. त्यानुसार अत्यंत कमी वेळेत रस्त्याचे काम मार्गी लागले.