बारामती शहरात अटक केलेल्या संशयित इसमाने विक्री केलेले आणखी दोन पिस्तल बारामती शहर पोलिसांकडून जप्त.
पोलीस कोठडी रिमांड मध्ये कसून चौकशी केली
बारामती शहरात अटक केलेल्या संशयित इसमाने विक्री केलेले आणखी दोन पिस्तल बारामती शहर पोलिसांकडून जप्त.
पोलीस कोठडी रिमांड मध्ये कसून चौकशी केली.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरांमध्ये देशमुख चौकात हत्यार विक्रीसाठी आलेला संशयित इसम देवेन्द्र उर्फ बंडू हुकुमचंद यादव वय सत्तावीस वर्ष राहणार हांडिया खेडा तालुका खांडवा जिल्हा मध्य प्रदेश याला बारामती शहर पोलिसांनी अटक करून त्याची तीन दिवस पोलिस कोठडी घेतली त्याच्याकडून त्या दिवशी एक देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली होती.
सदर आरोपी इकडे पोलीस कोठडी रिमांड मध्ये कसून चौकशी केली असता या इसमाने आणखी दोन देशी बनावटीचे पिस्टल व दहा जिवंत काडतुसे पुणे येथे दिलीप दिनकर शेळके वय 47 वर्ष राहणार विश्रांतवाडी पुणे यास विक्री केल्याचे निष्पन्न झाले.
सदरचा दिलीप शेळके हा बँक व फायनान्स कंपनीच्या वसुलीची कामे करतो त्यासाठी त्यांनी सदर पिस्टल वसईमध्ये धाक दाखवण्यासाठी विकत घेतल्याचे तपासात माहिती दिली सदर दिलीप शेळके गेला सुद्धा पोलिसांनी अटक करून दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड घेतली आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक तसेच बारामती शहर पथकाचे गुन्हे शोध पथक पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे अभिजीत कांबळे दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर तुषार चव्हाण बंडू कोठे शाहू राणे गौरव ठोंबरे यांच्या पथकाने केली आहे अशा रीतीने या संशयित इसमाने विक्री केलेली तीन देशी पिस्टल किंमत सर्व मिळून एक लाखाचे हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत.
अग्निशस्त्र चा वापर गुन्ह्यांमध्ये झाल्यानंतर जनतेमध्ये घबराट निर्माण होते तरी या अग्नी शस्त्रांचा वापर होऊ नये यासाठी सर्व तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की या प्रकारे कोणाकडे जर अग्निशस्त्र असतील त्या बाबत गोपनीय माहिती तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्याला किंवा पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मोबाईल व्हाट्सअप वर देण्यास विनंती आहे.