स्थानिक

बारामती शहरात युरीयाचा ट्रक नविनच काम केलेल्या चेंबर मध्ये अडकला…

पालिकेकडून तीन दिवसांपूर्वीच करण्यात आली होती चेंबरची डागडुजी

बारामती शहरात युरीयाचा ट्रक नविनच काम केलेल्या चेंबर मध्ये अडकला…

पालिकेकडून तीन दिवसांपूर्वीच करण्यात आली होती चेंबरची डागडुजी.

बारामती वार्तापत्र

काल सकाळी दहाच्या सुमारास शहरातील एका गोडाऊनमध्ये युरिया उतरविण्यासाठी आलेला ट्रक चेंबरमध्ये चाक अडकल्याची घटना घडली आहे.

शहरातील बालक मंदिर शाळेसमोर युरिया वाहतूक करणारा ट्रक (एम.डब्ल्यू.के ०६१३) चेंबरमध्ये अडकला. ट्रक जागेवरच अडकल्याने पुढील अनर्थ टळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणाही जखमी झाले नाही. परंतु, लोकवस्तीत घटना घडल्याने परिसरातील रहिवासी घाबरले होते.

पालिकेकडून तीन दिवसांपूर्वीच या चेंबरची डागडूजी करण्यात आली होती.

काल सकाळी दहाच्या सुमारास शहरातील भिगवण चौकाजवळील बालक मंदिर शाळेसमोरील एका गोडाऊनमध्ये युरिया उतरविण्यासाठी ट्रक आला होता. मात्र रस्त्यात मोडकळीस आलेल्या चेंबरमध्ये अवजड ट्रकचे चाक अडकले व चेंबर खचला. चेंबरमध्ये चाक अडकल्याने ट्रक एका बाजूला झुकला. अगदी काही फुटांवरच याठकाणी घरे आहेत. शिवाय या रस्त्यावरून मोठी रहदारी होत असते. ट्रकचे चाक अडकून जागेवरच कलंडल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान येथील रहिवासी गिरीश दळवी यांनी बारामती नगरपालिकेकडे चेंबर खचून मोठा खड्डा पडल्याने, तो दुरुस्त करण्यासाठी अर्ज केला होता. पालिकेकडून तीन दिवसांपूर्वीच चेंबरची डागडुजी करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!