स्थानिक

बारामती शहरात हिंदू तिथी प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

शहरात भगवे वातावरण निमार्ण

बारामती शहरात हिंदू तिथी प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

शहरात भगवे वातावरण निमार्ण

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात हिंदू तिथी प्रमाणे शिवजयंती उत्सव समिती आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती  झाली .गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे कोणताही सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आले नाहीत यावेळेस निर्बंध शिथिल झाल्याने शिवप्रेमीनी जल्लोषात जयंती साजरी केली आसुन शहरात भगवे वातावरण निमार्ण झाले आहे.

छत्रपती शिवाजी उद्यान येथे मान्यवरांच्या हस्ते शिवपुजन करण्यात आले सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष सदाबाप्पु सातव ,नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे , पोलीस अधिकारी सुनिल महाडिक, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष सुनिल (आण्णा )शिंदे, बारामती बँकचे चेअरमन सचिन सातव, प्रांत अधिकारी कांबळे साहेब, तहसीलदार हनुमंत पाटील, चीफ ऑफिसर रोकडे साहेब ,राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर ,मानसे उपाध्यक्ष सुधीर पाटसकर,हेमंत नवसारे , इम्तियाज शिकलकर , सौ कल्पना जाधव ,दिलीप ढवाण ,अमर धुमाळ , देवेंद्र शिर्के ,प्रदीप शिंदे ,दिलीप शिंदे ,सूरज सातव, दीपक मालगुंडे ,छगन आटोळे,संजय किर्वे ,अँड जी बी गावडे , सुनील कदम, संजय किर्वे, सुनिल सातव, उमेश दुबे ,बबन पारख, जितेंद्र जाधव, संभाजी माने ,जब्बार पठाण, राकेश सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते .सायंकाळी शहरातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक उंट घोडे, ,पारंपरिक न्रुत्य पथके ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button