बारामती शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,४ लाख ५ हजार रुपये किमतीचे २७ गहाळ मोबाईल हस्तगत
एकूण ४,०५,०००/- रुपये किमतीचे २७ मोबाईल

बारामती शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,४ लाख ५ हजार रुपये किमतीचे २७ गहाळ मोबाईल हस्तगत
एकूण ४,०५,०००/- रुपये किमतीचे २७ मोबाईल
बारामती वार्तापत्र
बारामती शहर परिसरातील सार्वजनिक ठिकाणे व बाजारपेठांमधून गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात बारामती शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एकूण ४,०५,०००/- रुपये किमतीचे २७ मोबाईल फोन पोलिसांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून शोधून काढून हस्तगत केले आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. श्री. संदिप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. गणेश बिरादार (बारामती विभाग) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. डॉ. सुदर्शन राठोड (बारामती उपविभाग) यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली.
त्याअनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाने विशेष मोहिम हाती घेतली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक सतिश राऊत यांच्यासह पोलीस अंमलदार अभिजित कांबळे, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, सागर जामदार, अक्षय सिताप, विशाल शिंदे, गिरीश नेवसे, विशाल चौधर, पोपट कवितके, वैभव मदने, अमोल देवकाते यांनी परिश्रमपूर्वक काम केले.
तांत्रिक विश्लेषण व तपासाच्या आधारे हे मोबाईल फोन शोधून काढण्यात आले असून, ते मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. संबंधित मोबाईलचे मूळ मालकांनी पोलीस अंमलदार सागर जामदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.
मोबाईलचे मूळ मालक यांनी पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा
1. सतिश दत्तात्रय झगडे – बारामती
2. अमोल भगवान साळवे – आमराई, बारामती
3. नंदकुमार उत्तम साठे – देवळेपार्क, बारामती
4. ऋतुजा सतिश भुजबळ – डोर्लेवाडी, बारामती
5. संदीप दत्तात्रय बनसोडे – काझड, इंदापूर
6. संदीप भारती – बारामती
7. दादासाहेब पवार – अहमदनगर
8. अविनाश लोंढे – बारामती
9. उमेश दानोळे – गुणवडी रोड, बारामती
10. गणेश नंदकुमार दंडाले – शेवाळवाडी, पुणे
11. शिरीन बागवान – कसबा बारामती
12. विकास हनुमंत सावंत – कुरवली, इंदापूर
13. विनोदकुमार अरविंद साळुंखे – कसबा बारामती
14. ऋतुजा बापुराव शिंगाडे – सूर्यनगरी, बारामती
15. दीपक मोरे – मळद, बारामती
16. लक्ष्मी बबन आगम – शारदानगर, बारामती
17. सोनाली सूर्यकांत माने – गुळुकरवस्ती, फलटण रोड
18. विनोद शिंदे – अंथुर्णे, इंदापूर
19. सोनाली राहुल तांबे– विजयनगर, बारामती
20. हनुमंत पिलोबा सावंत – मेखळी, बारामती
21. स्मिता गणेश कवडे – यारामती, बारामती
22. आशितोष नानासाहेब सलगर – बारामती
23. अश्विन महादेव कांबळे – मळद, बारामती
24. अंजिक्य प्रकाश कांबळे – खांडज, बारामती
25. रंजना चक्रनारायण – बारामती
26. विवेक गोकुळ टांकसाळे – काटेवाडी, बारामती
27. महादेव बलभिम सावंत – बेलवाडी, इंदापूर






