बारामती शहर पोलिसांची मटका आड्ड्यावर कारवाई
गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली
बारामती वार्तापत्र
बारामती पोलिसांनी खाजगी सावकारी पाठोपाठ बारामती शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध मटका चालवणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिडीसीसी बँक जवळ प्रबुद्ध नगर अमराई बारामती येथे अर्जुन पाथरकर नावाचा इसम बेकायदा कल्याण मटक्याच्या चिठ्ठ्या फाडून पैसे घेत असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांना गोपनीय बातमीदार यामार्फत माहिती मिळाली.
त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक रामगर यांनी त्यांच्या पोलिस पथकाला माहिती देऊन सदर ठिकाणी पोलीस गेले असता पाथरकर एका ओट्यावर बसून हातात पॅड व आकड्यांचा तक्ता असलेला दिसला. पोलीस पाहताच तो पळून जाऊ लागला मात्र त्यास पोलिसांनी पकडले. अर्जुन राजू पाथरकर राहणार एसटी स्टँड समोर असे आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून तीन हजार एकशे वीस रुपये रोख, दोन स्लिप बुक तीन हजार 122 रुपये किमतीचे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सदरच्या व्यक्तीवर मुंबई जुगार ॲक्ट कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस नाईक काटकर ,पोलीस हवालदार तानाजी गावडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली.