स्थानिक

बारामती शहर पोलिस निरीक्षक विलास नाळे यांची बदली

श्रीशैल चिवडशेट्टी यांच्याकडे बारामती शहर पोलिस ठाण्याचा पदभार 

बारामती शहर पोलिस निरीक्षक विलास नाळे यांची बदली

श्रीशैल चिवडशेट्टी यांच्याकडे बारामती शहर पोलिस ठाण्याचा पदभार

बारामती वार्तापत्र 

नगरपरिषद निवडणूका एकीकडे जाहीर होत असतानाच जिल्हा पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील पाच पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.

बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास नाळे यांची इंदापूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. वाहतूक शाखेचा तीन आठवड्यांपूर्वीच पदभार घेतलेल्या श्रीशैल चिवडशेट्टी यांच्याकडे बारामती शहर पोलिस ठाण्याचा पदभार दिला गेला आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षकांनी इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांक देवराव कोकणे यांची सायबर पोलिस ठाण्यात बदली केली आहे, तर विलास किसन नाळे यांची इंदापूरला, वाहतूक शाखेचे निरीक्षक श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी यांची बारामती शहर पोलिस ठाण्याला तर नव्याने जिल्ह्यात हजर झालेल्या पोलिस निरीक्षक विजयमाला महादेव पवार यांची जिल्हा विशेष शाखा २ येथे व पोलिस निरीक्षक निलेश पांडूरंग माने यांची बारामती वाहतूक शाखेत बदली केली. प्रशासकीय निकड व जनहित लक्षात घेत या बदल्या केल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षकांनी आदेशात म्हटले आहे.

 

Back to top button