बारामती शहर पोलीस ठाण्यातील अभिमान माळी याला तीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक
40 हजार रुपयांची लाच तक्रारदाराच्या पत्नीकडे मागितली होती.
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2021/10/Bribery-aurangabad-696x364-1.jpg)
बारामती शहर पोलीस ठाण्यातील अभिमान माळी याला तीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक
40 हजार रुपयांची लाच तक्रारदाराच्या पत्नीकडे मागितली होती.
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलिस ठाण्याचा हा सहायक फौजदार असून संदिपान अभिमान माळी असे याचे नाव आहे. याने 40 हजार रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला आज रंगेहाथ पकडले. बारामती शहर पोलिस ठाण्यानजिकच सापळा रचून माळी याला पकडण्यात आले. दरम्यान बारामती शहर पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र तक्रारदाराच्या बाजूने पाठविण्यासाठी 40 हजारांची लाच माळी यांनी मागितली होती. मात्र तडजोडीनंतर ती 30 हजारांवर आली, हीच लाच स्विकारताना माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलिस निरिक्षक भारत साळुके, हवालदार नवनाथ वाळके, भूषण ठाकूर, चंद्रकांत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.