बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडुन रिक्षाने येवुन डोळयात चटणी टाकुन गळयातील सोन्याची चैन चोरी करणारे आरोपी जेरबंद
२,५०,०००/-रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत
बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडुन रिक्षाने येवुन डोळयात चटणी टाकुन गळयातील सोन्याची चैन चोरी करणारे आरोपी जेरबंद
२,५०,०००/-रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत
क्राईम; बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत मौजे बालकमंदीर मागे खाटीक गल्ली येथे कोणीतरी अज्ञात चोरटयांनी एका इसमास त्याचे राहते घरात घुसुन त्याचे डोळयात चटनी टाकुन त्याचे गळयातील अर्धा तोळा वजनाची चैन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन जबरी चोरी करून पळुन गेले बाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला दि. ०४/०७/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याप्रमाणे गुन्हयातील गेले मालाचा व अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने चालू केला सि.सि.टी.व्ही फुटेज तसेच गुप्त माहितीदार यांचे मार्फत यातील आरोपी नामे १)नसिम दिलावर इनामदार रा.कसबा बारामती ता.बारामती जि.पुणे २)फिरोजा असिफ सययद रा.पदमावती नगर गितांजली विहार दौड ता.दौड जि.पुणे ३)सलिम मुजीब सययद रा.खडकीबाजार राजुगांधीनगर जि पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस चौकशी केली असता यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचेकडून तपासादरम्यान अर्धा तोळा वजनाची सोन्याची चैन तसेच गुन्हयात वापरलेली काळे रंगाची अँटी रिक्षा असा एकुण २,५०,०००/-रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत करून गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख,मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री मिलीद मोहिते सो,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर साो,पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,सहायक फौजदार शिवाजी निकम,पोलीस नाईक रूपेश साळुके,पो.कॉ.सुहास लाटणे,दशरथ इंगोले,अजित राऊत,तुषार चव्हाण,अकबर शेख यांनी केली.