राजकीय

बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी जाहीर..!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून

बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी जाहीर..!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून

बारामती वार्तापत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती शहर युवक कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहराध्यक्ष ॲड किरण इंगळे, युवक शहराध्यक्ष अभिजीत घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, युवा नेते जय पवार यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून व पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आल्याची माहिती युवक शहराध्यक्ष अभिजीत घाडगे यांनी दिली. या प्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड किरण इंगळे, माजी नगराध्यक्ष इम्तियाजभाई शिकलकर, राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी (PRO) सुरज देवकाते, विद्यार्थी सेल अध्यक्ष मेघराज माने तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते होते.

अशी आहे युवक कार्यकारणी

शहर युवक उपाध्यक्ष – संदीप अडागळे, गौरव जाधव, रोहित तपकिरे, सचिन नगरे, श्रीकांत सोनवणे, ओंकार महाडिक, कुणाल झगडे, किशोर पाचंगे, युवक कार्याध्यक्ष – गौतम शिंदे, अभिजीत ढवाण, मयूर दराडे, युवक सरचिटणीस- शुभम गालींदे, स्वप्नील काकडे ,प्रसाद लोळगे, ओंकार शिंदे, सुरज खामगळ, योगेश पवार ,साबीर पठाण, राहुल बनकर , युवक संघटक – रोहित चौधर धनंजय ढवाण, आयुष गुप्ता, स्वप्निल हेंद्रे, प्रियांशु भोसले, प्रतीक जोजारे , प्रसाद गाडे, गणेश काजळे, ओंकार जाधव, प्रणव जमदाडे युवक सोशल मीडिया प्रमुख – तुषार सावंत

Back to top button