क्राईम रिपोर्ट

बारामती हादरले…! जागेत बाथरूम बांधल्याच्या रागातून बापलेकाने तरुणाला संपवले

तिघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले

बारामती हादरले…! जागेत बाथरूम बांधल्याच्या रागातून बापलेकाने तरुणाला संपवले

तिघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या जागेत बाथरूम बांधल्याच्या रागातून बाप लेकाने एका तरुणाला संपवल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सौरभ विष्णू इंगळे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर बुधवारी (दि.१०) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी प्रमोद रामचंद्र इंगळे आणि रामचंद्र जगन्नाथ इंगळे या बाप-लेकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभने आपल्या जागेत बाथरूम बांधल्याचा दावा करत प्रमोद आणि रामचंद्र यांना जाब विचारला. यावरून तिघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि प्रमोद व रामचंद्र यांनी सौरभला बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सौरभला चुलत भावांनी बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सौरभचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे, मारहाणीनंतर प्रमोद आणि रामचंद्र स्वतः तालुका पोलीस ठाण्यात सौरभविरोधात तक्रार देण्यासाठी गेले होते. परंतु, त्याचवेळी सौरभच्या मृत्यूची माहिती पोलिसांना मिळाली.

सौरभने मारहाण होत असल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. मात्र, रुग्णालयात त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रमोद आणि रामचंद्र यांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, भावकीच्या किरकोळ वादाचे खुनात रूपांतर झाल्याने गावकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button