बारामती हाॅटेल कामगाराचा खून,आरोपी एका तासात केला जेरबंद
त्याच्याविरुध्द आठ गुन्हे दाखल
बारामती हाॅटेल कामगाराचा खून,आरोपी एका तासात केला जेरबंद
त्याच्याविरुध्द आठ गुन्हे दाखल
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जळोची बारामती येथे नुकतेच नवीन सुरू झालेले मातोश्री या हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करीत असलेला इसम नामे गणेश प्रभाकर चव्हाण रा.मालेगाव जि. नाशिक याचा त्याच हॉटेलमधील दुसरा कामगार विकास दीपक सिंग वय- 23 वर्ष मूळ रा. चंदिगड पंजाब सध्या रा. अमराई बारामती जिल्हा पुणे याने हॉटेल मधील किरकोळ कामाचे कारणावरून दि. 13/5/2022 रोजी 2.15 वा. सुमारास जळोची बारामती येथील मातोश्री हॉटेल च्या आवारामध्ये आरोपीने मयत आचारी याचे अंगावर चेहऱ्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारले. व आरोपी यांनी आपल्या मूळ गावी पंजाबला जाण्यासाठी धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण यांनी तपास पथकातील अंमलदार राम कानगुडे पोलीस नाईक रंजीत मुळीक पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत यांना व नाईट राउंड चे पोलीस अधिकारी श्री लेंडवे व त्यांचे सोबत चे अंमलदार यांना आरोपीला तात्काळ पकडण्या बाबत योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून स्वतः आरोपीचा शोध घेणे कामी मोहीम हाती घेतली. व एक तासाच्या आत चंदिगड पंजाब या मूळ गावी पळून निघालेला आरोपी देवीचे माळ बारामती येथून ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.
सदर बाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 283 /22 भादवि कलम 302.323,504. प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल घुगे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अभिनव जी देशमुख साहेब पुणे ग्रामीण .अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद जी मोहिते साहेब बारामती विभाग पुणे ग्रामीण .उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब बारामती विभाग. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण बारामती तालुका पोलीस स्टेशन सहा.पोलीस निरीक्षक श्री राहुल घुगे . पोसई श्री लेंडवे पोलीस हवा. श्री राम कानगुडे . पोलीस नाईक, अमोल नरूटे, रणजीत मुळीक ,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत , सहाय्यक फौजदार भागवत या सर्वांनी
हॉटेल मालकांनी कामगारांची माहिती ठेवावी
बारामतीतील हॉटेल मालकांनी आपल्याकडे कामावर ठेवलेल्या कामगारांची सर्व माहिती पोलिस ठाण्याना द्यावी. कामगारांची आधारकार्ड घ्यावीत, आपण कामावर ठेवत असलेले कामगार गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत ना ? याची खात्री करावी. अन्यथा हॉटेल मालकांवरच गुन्हे दाखल करण्याची वेळ येईल.
– महेश ढवाण, पोलिस निरीक्षक