स्थानिक

बारामती ॲटो रिक्षा विशेष तपासणी मोहीमेत ११२ रिक्षांची तपासणी

एकूण 30 वाहनांवर कारवाई करण्यात आली.

बारामती ॲटो रिक्षा विशेष तपासणी मोहीमेत ११२ रिक्षांची तपासणी

एकूण 30 वाहनांवर कारवाई करण्यात आली.

बारामती वार्तापत्र 

शहरातील वाहतूक सुरळीत राहण्याच्यादृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तीन दिवसीय ॲटो रिक्षा विशेष तपासणी मोहीम आयोजन करुन एकूण ११२ ॲटो रिक्षांची तपासणी करण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत वायुवेग पथकामार्फत एस.टी. बस थांबा परिसर, तीन हत्ती चौक, इंदापुर चौक, कसबा, मोरगाव रोड, पेन्सील चौक, भिगवण चौक या परिसरात ॲटो रिक्षांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेत एकूण ११२ ॲटो रिक्षांची तपासणी करुन दोषी असलेल्या एकूण 30 वाहनांवर कारवाई करण्यात आली.

यामध्ये १ लाख २ हजार २०० रुपये इतके तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे.

Back to top button